आजकाल अनेक बॉलिवूड स्टार्स इडियट बॉक्सच्या प्रेमात असून ते लवकरच वेगवेगळ्या मालिकांमधून आपल्याला दिसतील. छोट्या पडद्यावर हजेरी लावणाऱ्या अशाच काही प्रमुख चेहऱ्यांविषयी.जॉनी लिव्हर नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध विनोदी अभिनेता जॉनी लिव्हर सब टीव्हीवरच्या 'पार्टनर्स' या मालिकेतून हसवायला येत आहे. तब्बल १० वर्षांच्या ब्रेकनंतर ते टीव्हीवर परत दिसतील. हा अनुभवी अभिनेता पोलीस कमिशनरच्या भूमिकेत दिसेल. नुकताच प्रदर्शित झालेला गोलमाल रिटर्न मधील जॉनी लिव्हरचा अभिनयाने प्रेक्षकांना नवी पर्वणीच दिली आहे. त्यामुळे त्यांच्या या येणाऱ्या मालिकेत काय वेगळं असेल हा उत्सुकतेचा भाग बनला आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews